Maharashtra Mandal MalaysiaIndia Flag    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ   Maharashtra Mandal Malaysia   Shree Ganesh    Bal Gangadhar Tilak   Malaysia Flag   

ई-विशेषांक

Runanubandh

महत्वाचे दूरध्वनी

Emergency Numbers

Emengency Contacts

Facebook

Us on Facebook

Androidapp

Download App

जाहिरात

Value Bazar KL Malaysia

Contact Us

President
Dr.Ameya Hasamnis
Contact :+60175044972
marathikl@gmail.com

Vice President
Mr.Ashotosh Deshpande
Contact :+60123293429
marathikl@gmail.com

Secretary
Mr.Sandesh Savardekar
Contact :+601123743016
marathikl@gmail.com

आमच्या बद्दल :
नमस्कार,

महाराष्ट्र मंडळ, मलेशिया; आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आमच्या बद्दल......! आम्ही कोण ? कुठले? इथे कशासाठी.....? साहजिकच सर्वांना ही उत्सुकता असतेच. मलेशियाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर इथे आलेल्या मराठी लोकांनी मिळून स्थापिलेले हे 'आपले' महाराष्ट्र मंडळ.
ऐंशी-नव्वदच्या दशकात मलेशियातील मराठी लोकांची संख्या वाढत गेली आणि नंतर मराठी माणसांच्या भेटीगाठी, कौटुंबिक कार्यक्रम होत गेले. त्यातल्याच काही उत्साही मित्रमंडळीनी मिळून १९९७ साली सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा केला आणि तिथेच महाराष्ट्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या उत्साही मित्रांना इतराची साथ मिळाली आणि नवीन वर्षाच्या, गुढी पाडव्याच्या स्नेह-संमेलनालाही सुरुवात झाली. पुढे सातत्याने प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम होत गेले. वर्षांमागून वर्षे सरली आणि हा हा म्हणता १०-१२ उपस्थितांचे २०० कधी झाले कळलेच नाही . आज आपला महाराष्ट्र मंडळाचा परिवार खूप मोठा झाला आहे.
मलेशियातील सर्व मराठी माणसे एकत्र यावीत, वरचेवर भेटीगाठी व्हाव्यात आणि परदेशात राहूनही मनातला 'महाराष्ट्र' आणि 'स्वदेश' जपता यावा हेच प्रमुख उद्दिष्ट उराशी बाळगून आम्ही प्रत्येक वर्षी स्नेह-संमेलनं आयोजित करत आहोत. स्नेह-संमेलनातील विविध कार्यक्रमांतून, मराठी भाषा,संस्कृती व कला यांची ओळख पुढील पिढीला व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आमचा प्रयत्न असतो.
अहो ! आमचे सदाबहार सभासद हाच आमच्या महाराष्ट्र मंडळाचा पाया आहे. प्रत्येकजण मंडळाच्या कार्यक्रमास आपल्यापरीने सह-कुटुंब हातभार लावत असतो. या स्नेह-सोबत्यांचा वाढता प्रतिसाद आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेतूनच आम्ही महाराष्ट्र मंडळाचे नवीन उपक्रम सुरु करणार आहोत.
मलेशियातील मराठी लोकांसाठी एक 'संवाद-मंच' उपलब्ध व्हावा, तसेच नवीन येणाऱ्या लोकांना महाराष्ट्र मंडळ, मलेशिया संबधी माहिती मिळावी हेच या संकेतस्थळाचे प्रयोजन. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास

" II मराठा तितुका मेळवावा I महाराष्ट्र धर्म वाढवावा II ".

जय हिंद ! जय महाराष्ट्र !